कल्याण ( संजय कांबळे ) : कल्याण मुरबाड रेल्वे मार्गासाठी लागणा-या जमीन मोजणीस तालुक्यातील मानिवली गावच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे, हा विरोध मोडत प्रशासनाने बळाचा वापर केला तर आम्ही सामुहिक आत्मदहन करणाच्या इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासन यावर काय भूमिका घेते यावर पुढील अंदोलनाची दिशा ठरणार आहे.
कल्याण मुरबाड रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण करण्यासाठी एकूण१५००शे कोटी खर्च अपेक्षित आहे, परंतु अद्यापही याबाबत अनेक शंका-कु शंका शेतकऱ्यांच्या आहे, या मार्गासाठी काही गावातून रेल्वे जमीन मोजणी झाली असली तरी मानिवली गावातील शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे, याचे कारण म्हणजे, आज या भागात रेल्वेने नेमलेल्या एजन्शी चे अधिकारी, कर्मचारी जमीन मोजणीस आले होते, मात्र येथील शेतकऱ्यांनी याला प्रखर विरोध केला, त्यांचे म्हणणे आहे की, यामुळे आमच्या गावातील१७००से गुंठे जमीन बाधित होणार आहे, तर २५००से फळझाडे जात आहेत, शिवाय२५ते३०घरावर बुलडोझर फिरणार आहे, आम्ही कायमचे बेघर होणार आहे, असे असताना रेल्वे प्रशासन, ना लोकप्रतिनिधी, ना मंत्री, आमच्याशी चर्चा करत नाही, बैठक घेत नाहीत, ना आमच्या साठी काय करणार आहोत हे सांगत नाहीत,मग आम्ही आमचे आयुष्य कसे उध्वस्त होऊ देणार ?
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असा आहे का 'सबका साथ सबका विकास'बळी राजाला भकास करून कसला विकास करणार आहेत,?असा सवाल यावेळी शेतकरी सुनील दत्ता गायकर यांनी उपस्थित केला.
यावेळी चंद्रकांत गणपत गायकर, संतोष राम वारघडे, रुपेश गायकर, सुनील गायकर, बाळाराम माळी, रामलाल सहानी, विजय माळी, जयवंती गायकर, कल्याणी बफाळे, आदी शेतकरी, पुरुष, महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आमचा कल्याण मुरबाड रेल्वे ला विरोध नाही, आमची घरे वाचवून पर्यायी जागा आहे, तेथून रेल्वे न्हावी, म्हणजे विकास पण होईल व आमचे जीवन पण उध्वस्त होणार नाही, याउलट आमचा विरोध डावलून बळाचा वापर केला तर असे आम्ही बरबाद होणार आहोतच, त्यापेक्षा आम्ही सामूहिक आत्मदहन करण्याची तयारी ठेवली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणें आहे, त्यामुळे प्रशासनाने यावर गंभीरतेने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.