ठाणे दि.30 कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा-खेड च्या वतीने कुणबी समाजाचा स्नेह मेळावा, हळदीकुंकू समारंभ व दिनदर्शिकेचा वितरण सोहळाचे आयोजन रविवार दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता दिवा येथील साऊथ इंडियन इंग्लिश स्कुल हॉल, दिवा रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक आठ समोर, सुरेश नगर, दिवा (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले आहे.
तरी रत्नागिरी खेड तालुक्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, येथील समाज बांधवांनी व महिलांनी हळदीकुंकू समारंभासाठी मोठया संख्येने उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी 9653391877 या नंबर संपर्क करावा, असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा-खेड अध्यक्ष शंकर बाईत यांनी केले आहे .