डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीपदी भारतीय जनता पार्टीचे दत्ता गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.या निवडणुकीसाठी 17 सदस्य उपस्थित होते. दत्ता गायकवाड यांचा एकमेव अर्ज आला होता .दत्ता गायकवाड हे भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांचे कट्टर समर्थक आहेत.
यावेळी दत्ता गायकवाड यांनी शेतकरी व्यापाऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हाअध्यक्ष नाना सूर्यवंशी म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण,शिवसेना कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपा आमदार किशन कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट ) स्थानिक नेते प्रमोद हिंदूराव यांच्या मार्गदर्शना खाली महायुतीचे दत्ता गायकवाड यांची कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
भाजपा आमदार सुलभा गायकवाड म्हणाल्या, भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. दत्ता गायकवाड यांचेही अभिनंदन करत आहे.