भजन स्पर्धेत ज्ञानेश्वर प्रसादिक भजन मंडळ देसाई यांनी द्वितीय क्रमांक पटकावला
ठाणे ( विनोद वास्कर) : २७ जानेवारी २०२५ रोजी स्वर्गीय धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने शक्ती स्थळ, आर्य किडा मंडळ मैदान, पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाजूला खारकर आळी ठाणे पश्चिम येथे भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दिवसभरात २० भजन मंडळींनी सहभाग घेतला होता. त्यातून प्रथम क्रमांक सोमसाई भजन मंडळ (दिवा,बुवा : भावेश शितकर) द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वर प्रासादिक भजन (मंडळ देसाई पाटील पाडा,बुवा : चेतन पाटील, पखवाज:रोहित पाटील,तब्बला : सुरज पाटील,कोरस रतन पाटील,महेंद्र पाटील,मधुकर पाटील,बंटी पाटील,हनुमान पाटील,राम पाटील ) तृतीय क्रमांक लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ (दिवा, बुवा :राजाराम परब) यांनी पटकावला आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्ताने दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने स्मृतीस्थळावर आले होते.मोठ्या उत्साहात धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली.