डोंबिवली ( शंकर जाधव ) : इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांवर विशेष लक्ष देवून शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेसाठी उत्तम दिशा दाखविणाऱ्या डोंबिवलीतील खर्डीकर क्लासच्या सुनिल खर्डेकर यांनी आमदार राजेश मोरे यांचा गौरव सत्कार केला. राजेश मोरे यांनी खर्डीकर क्लासमधील विद्यार्थ्यांची तसेच सुनिल खर्डीकर यांची सदिच्छा भेट घेतली. दरम्यान त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शहरात गेली तीस वर्षे सुनिल खर्डीकर क्लासेस माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. आमदार राजेश मोरे हे त्याचं विभागात पूर्वीपासून स्थानिक नगरसेवक असल्याने खर्डीकर यांच्या अत्यंत परिचयाचे आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नयेत म्हणून मोरे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मदतीचा हात खर्डीकर यांना दिला आहे. विधानसभा निवडणुकीत राजेश मोरे हे प्रचंड मतांनी निवडून आल्यानंतर त्यांचा सत्कार करण्याची प्रबळ इच्छा खर्डीकर यांची होती. मात्र वेळेअभावी ते जमले नाही. त्यामुळेच सदिच्छा भेटी दरम्यान सत्कार सोहळा करण्यात आल्याचे सुनिल खर्डीकर यांनी सांगितले.यावेळी समाजसेवक
सुरेश वावळ देखील उपस्थित होते.
आमदार राजेश मोरे यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी खर्डीकर यांनी इच्छा व्यक्त केली की, आता डोंबिवली शहरात मोठंमोठी संकुल उभी राहत आहेत. शहराच्या विकासात मोठी भर पडत आहे. या शैक्षणिक व सांस्कृतिक शहराची घोडदौड मोठी आहे. शहर नामवंत लोकांचं माहेरघर आहे. नव्या संकल्पना याच शहरातून पुढे येत आहेत आणि आल्याही आहेत. पण खत एकच की या शहराला मंत्रिपद मिळणे क्रमप्राप्त होते. येथील लोकप्रतिनिधीही तेव्हढ्याच क्षमतेचे आहेत.
शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच सहशैक्षाणिक उपक्रमांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी आमचे शिक्षकवृंद,आमचे क्रिडाप्रशिक्षक सदोदित कार्यरत असतात. याची प्रचिती म्हणजे उत्तम शैक्षणिक प्रगती बरोबरच विद्याथी विद्यार्थिनी जुडयो, कराटे, क्रिकेट, अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारात संगीत, अभिनय, चित्रकला, वक्तृत्व, हस्ताक्षर, इंग्रजी, गणित प्राविण्य आदी क्षेत्रामध्ये जिल्हा आणि राज्यपातळीपर्यंत मुलांना संधी देतो. त्यातूनच ते उत्तम करियर घडवतात असेही यावेळी सुनील खर्डीकर यांनी सांगितले.