Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे “आदर्श जिल्हा” आणि “उत्तम कार्यकर्ता” पुरस्कार जाहीर


ठाणे जिल्हा समन्वय समितीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

ठाणे,दि.23 :- राजपत्रित महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवार, दि.07 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या हस्ते अधिकारी महासंघ कल्याणकेंद्र (नियोजित), बांद्रा (पूर्व), मुंबई 400 051 येथे “आदर्श जिल्हा” पुरस्कारप्राप्त जिल्हा समिती आणि “उत्तम कार्यकर्ता” पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार तथा संस्थापक ग.दि.कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, कोषाध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस समीर भाटकर आणि दुर्गा महिला मंचाच्या अध्यक्षा सिद्धी संकपाळ यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल ठाणे जिल्हा समन्वय समितीस “आदर्श जिल्हा” तसेच कार्यकारिणीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप आणि कोकण विभागीय सहसरचिटणीस तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश भागवत यांची “उत्कृष्ट कार्यकर्ता” म्हणून राज्यस्तरीय निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, वस्तू व सेवा कर, बांद्रे, मुंबईच्या उपआयुक्त श्रीमती सुलभा भिलारे सणस, मुख्य अभियंता, सा.बां.वि., पुणे इंजि. अतुल चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई सहआयुक्त, सुनिल चव्हाण, मंत्रालय, मुंबई अवर सचिव, अशोक चेमटे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, राज्य परिवहन महामंडळाचे संचालक (वित्त) गिरीश देशमुख, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बांद्रा, मुंबईचे सचिव संदिप देशमुख, अर्थ व सांख्यिकी, बांद्रा, मुंबईचे मुख्य संशोधन अधिकारी नवेंदु फिरके, आयुक्त कार्यालय, नागपूरचे उपायुक्त, डॉ. कमलकिशोर फुटाणे, गडचिरोलीच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर, पशुसंवर्धन, कारंजा (लाड), वाशिम सहाय्यक आयुक्त डॉ.संदिप इंगळे, शासकीय दंत महाविद्यालय, मुंबईचे सहयोगी प्राध्यापक डॉ.सोनाली कदम, भूमी अभिलेख, अमरावतीचे उपसंचालक डॉ.लालसिंग मिसाळ, मंत्रालयाचे अवर सचिव संतोष ममदापुरे, नागपूर जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता इंजि. योगेश्वर निंबुळकर, कक्ष अधिकारी (16-अ), सा.प्र.वि., मंत्रालय श्रीमती पल्लवी पालांडे, सा.बां.वि., कोल्हापूरचे शाखा अभियंता इंजि. पुनम पाटील, वैद्यकीय अधिकारी, नांदेड डॉ. राजेंद्र पवार, लातूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, इंजि. वाळासाहेब शेलार, कोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनाही “उत्तम कार्यकर्ता” पुरस्कार तसेच कार्यालय सचिव रजनीश कांबळे यांना पत्रकारिता पदवी संपादन केल्याबद्दल “विशेष पुरस्कार” जाहीर झाला आहे.

त्याचप्रमाणे अमरावती, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, मुंबई उपनगर, पुणे या जिल्हा समन्वय समितींनाही “आदर्श जिल्हा” पुरस्कार जाहीर झाला आहे.

तरी या पुरस्कार सोहळ्यास राजपत्रित वर्ग 1 व 2 अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |