उपमुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. शिंदे व पालिका आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाची आमदार राजेश मोरे व माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी गुरुवार 23 तारखेला पाहणी केली. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आणि स्व.धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त भगवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्त
माजी नगरसेवक तथा परिवहन समिती माजी सभापती संजय लक्ष्मण पावशे व अपर्णा संजय पावशे यांच्या माध्यमातून महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल मधील रुग्णांना मोफत ब्लॅकेट व फळवाटप करण्यात आले. हा उपक्रम आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते पार पडला. हॉस्पिलमधील रुग्णांना फळे आणि उबदार ब्लँकेट देण्यात आले.यावेळी आमदार मोरे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील रुग्णांना ठाणे किंवा मुंबईत उपचाराकरता जाण्याची वेळ येणार नाही. रुग्णालयातील सुविधा न अन्य अडचणी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. शिंदे व पालिका आयुक्तांनाशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी नगरसेवक संजय पावशे, अपर्णा पावशे, केतकी पवार, धनाजी चौधरी, कल्पना कांबळे, सुदाम जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी
आमदार राजेश मोरे यांनी पाहणी केली असता शास्त्रीनगर हॉस्पिटल मधील अनेक त्रुटी दिसून आल्या. या रुग्णालयात बेडची कमतरता असल्याने एका महिला रुग्णावर चक्क जमिनीवर औषधोपचार करण्यात आल्याचे दिसून आले. याबाबत हॉस्पिटलचे प्रभारी प्रमुख डॉ. योगेश चौधरी यांनी त्यांच्या अनेक समस्या आमदार मोरे यांच्यासमोर मांडल्या. सध्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर, नर्स, सुरक्षा रक्षक आणि जागेचा अभाव असल्याच्या समस्या कर्मचाऱ्यांनी मांडल्या.अनेक वर्षापासून या रुग्णालयात पोलीस चौकीची मागणी असून याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असे कर्मचारी वर्गाचे म्हणणे आहे.मोरे यांनी हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना तुमच्या समस्या सोडविण्यासाठी हा विषय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून समस्या कशा सोडविल्या जातील याचा आपण प्रयत्न करू असे सांगितले.