डोंबिवली ( शंकर जाधव ) : गंगेत डुबकी मारुन पाप घुतले जात असेल तरीही येथील लोकांची घरे वाचलीत पुण्य जास्त मिळेल.एखाद्या सिलेब्रेटीवर काही प्रसंग आला तर त्याला भेटायला जायलाच पाहिजे. पण कल्याण डोंबिवलीतील लोक मरत आहेत. दिव्यात काही लोक रॉकेल घेऊन बसले आहेत. पालकमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी येऊन लोकांना भेटायला पाहिजे अशी टीका मनसे नेते राजू पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.सोमवार 24 तारखेला पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मनसे नेते पाटील म्हणाले, अनधिकृत बांधकामांचा आका ठाण्यात राहतो. ही एक साखळी आहे, पालिका, रजिस्ट्रेशन आफिस - बँकांचे अधिकारी यामध्ये सर्व समील आहेत. आर्थिकहितसंबंध जोपताना तसेच त्यांना अभय देण्याचे काम सामान्य लोकल अधिकारी कोणी करु शकत नाहीत. हे करण्यासाठी मोठ्या आकाची गरज आहे आणि त्याप्रमाणे होत आहे
मनसे नेते पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेना कल्याण जिल्हा अध्यक्ष दीपेश म्हात्रे म्हणाले, दीपेश म्हात्रे सहा महिन्यापूर्वी शिवसेना ठाकरें गटात गेले. ते चांगले काम करीत आहेत. मला त्यांचा फोन होता. माझी त्यांना विनंती आहे, ते जर पुन्हा घरवापसी करणार नसतील तर त्यांच्या मागे मी उभा राहणार. पालिका वार्ड अधिकारी यामध्ये अधिक जबाबदार आहे.मनसे हे रहिवासियांच्या पाठीशी आम्ही उभे राहतील. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे सगळेच बोलतात. या बाबतीत देखील मोठा प्रश्न आहे. सरकार आमचे नाही.