डोंबिवली ( शंकर जाधव ) : एकादशीच्या पावन पर्वानिमित्त कीर्तन सोहळ्याचे ह.भ.प. चेतन महाराज म्हात्रे यांच्या पुढाकारामुळे हा भव्य कार्यक्रम रविवार २२ तारखेला संध्याकाळच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील विठ्ठल मंदीर, दत्तनगर संतवाडा येथे पार पडला.
कीर्तनकार ह.भ.प. यशवंत महाराज घुले, शतकोटी ग्रंथालय यांच्या कीर्तनाच्या निमित्त राज्य सरकारच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पंढरपुरला जाणाऱ्या वारकरी माऊलीना पथकर सवलत प्रवेश (Toll Free Pass) सुविधा चालू करून ही सेवा आपल्या सर्व माऊलींना कुठलीही अड़चण किंवा त्रास न होता मिळावी म्हणून आमदार राजेश मोरे यांनी ही सेवा सुरु करून कीर्तन सोहळ्यात कीर्तनकार, भाविक, सेवेकरी आणि वारकरी बांधवांच्या उपस्थितीत वारकरी संप्रदाय यांना मोफत टोल वाहन पास देण्यात आले.