Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उबाठा दिवा शहराच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे नागरिकांना १३०० मोफत कार्ड वाटप



ठाणे (विनोद वास्कर ) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीने शिवसेना वर्धापदिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य कार्ड चे मोफत वाटप करण्यात आले ह्या कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख सचिन पाटील यांनी केले होते.


या कार्यक्रम मध्ये एकूण १३०० नागरिकांनी लाभ घेतला.दिवा शहरात मोठ्या संख्येने मध्यम वर्गीय नागरिक राहत असून त्यांच्या निरोगी आरोग्य राहण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


सामाजिक कार्यकर्ते आकाश विचारे यांनी ह्यावेळी जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे आणि युवानेते सुमित भोईर ह्यांच्या प्रमुख उस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.


ह्या वेळी लोकसभा संपर्क संघटीका मृणाल यज्ञेश्र्वरी, प्रवक्ते अनिश गाढवे, युवा सेना जिल्हाधिकारी प्रतिक पाटील, उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, उपजिल्हा संघटीका अंकिता पाटील, विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, कळवा-मुंब्रा विधानसभा समन्वयक विजय कदम, शिक्षक सेनेचे महाराष्ट्र राज्य उपसचिव मारुती पडळकर, युवा सेना शहरधिकारी अभिषेक ठाकूर, शहर संघटीका ज्योती पाटील, शहरसमन्वयक प्रियांका सावंत, विधानसभा समन्व्यक पंकज माळी,शहर सचिव उमेश राठोड, उपशहर संघटीका स्मिता जाधव, विभाग प्रमुख चेतन पाटील,रवी रसाळ , मार्लेश्वर पथपेढीचे साटम महाराज आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


Design by - Blogger Templates |