दिवा ( विनोद वास्कर ): युवासेना दिवा शहर सचिव उमेश राठोड यांचे विधी व कायदे शिक्षण (BA LL.B) यशस्वी रित्या पूर्ण करून वकील (ADVOCATE) झाल्या बद्दल कल्याण लोकसभेचे जिल्हाप्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे,सुमित सुभाष भोईर यांच्या हस्ते पक्षाच्या वरिष्ठांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
शहर प्रमुख सचिन पाटील, युवासेना शहर अधिकारी अभिषेक ठाकूर यांच्या संकल्पनेतून शिवसेना व युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी दिवा शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी व युवासैनिक उपस्थित होते.