Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

पर्यावरण दिनानिमित्त श्री खरवली आई सेवा ट्रस्ट शिळगाव वतीने वृक्षारोपण

ठाणे  दि. २३ ( विनोद वास्कर )  :  मौजे शिळ (खरवली देवी मंदिर परिसर), भोलेनाथ नगर, पोस्ट डावले ता.जि ठाणे या ठिकाणी सोमवार दिनांक २३ जून रोजी सकाळी १०:०० वाजता श्री खरवली आई सेवा ट्रस्ट शिळगाव यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.आलेल्या मान्यवरांचे ट्रस्टी कडून सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील नागरिक आले होते. पर्यावरण दिनानिमित्त ११०० वृक्ष वर्षभरात लावण्याचे उद्दिष्ट श्री खरवली आई सेवा ट्रस्टने ठेवले आहे. मागच्या २०२४ रोजी २०० लावण्यात आली होती. त्यापैकी १८० वृक्ष जगवले आहेत.

वाढती लोकसंख्या आणि विकासाच्या नावाखाली वर्षानुवर्षी जुनी वृक्ष ही तोडली जात आहेत.त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. म्हणून यावर्षी जास्त जास्त वृक्ष लावण्याचा ट्रस्टचा उद्दिष्ट आहे.श्री खरवली देवस्थान येथून वृक्षारोपणाला प्रारंभ झाला.वृक्ष आमचे सर्वधन तुमचे ही मोहीम राबवण्यात आली.वृक्षापासून मानवाला बरेच फायदे होतात.पाऊस पडण्यासाठी वृक्षांची आपल्याला मदत होते.कोविडच्या काळात सर्व नागरिकांना कळाले आहे की हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन ला किती खर्च येतो.वृक्ष असतील तर आपल्याला ऑक्सिजन मिळेल.वृक्ष असतील तर निसर्ग टिकेल.आणि पुढची पिढी जिवंत राहील.वृक्ष आपले सोयरे आहेत.वृक्ष हेच आपले खरे वैभव आहे.वनविभागाच्या भूखंडावर कोणी अतिक्रमण करून बांधकामे करू नये त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यायला हवं असे मनोगत आलेल्या मान्यवरांनी केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राजेशजी मोरे (आमदार कल्याण ग्रामीण ), सुभाष भोईर (माजी आमदार )हीरा पाटील (माजी नगरसेवक), नंदू परब( भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष) सुनिल आलिमकार (मानव सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष)संदिप मोर (वनरक्षक अधिकारी) पी.एस.आय जाधव, हनुमान आलिमकर ( हाशा रामा पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक),निलिमा कल्याणकर (ठा.म.पा. शाळा क्र. २६ मुख्याध्यापिका), सुभागी वाळज (ठा.म.पा शाळा क्र. ८१),साहील पाटील (भाजपा शिळ -दिवा युवा मोर्चा अध्यक्ष),संतोष भोईर (पोलीस पाटील संघटना तालुका अध्यक्ष ठाणे ) बाबुराव मुढे; गणेश मुढे, विलास म्हात्रे,प्रवीण पावशे,गिरीश पाटील,गीता भोईर,रामचंद्र भोईर, विश्वनाथ पाटील,श्याम काठे,स्वप्निल पावशे, बाबाजी पाटील, रतन म्हात्रे, बबन भोईर, प्रशांत भोईर, ऋषिकेश भोईर, संदीप भोईर, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ मंडळ शिळगांव, व श्री खरवली आई सेवा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व विस्वस्थ शिळगाव या कार्यक्रमाला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


Design by - Blogger Templates |