ठाणे : दिवा शहरात रोटरी क्लब ऑफ दिवा ची स्थापना २०१७ मधे झाली. तेव्हापासून रोटरी क्लब क्लबचे ९ वे अध्यक्ष म्हणून किशोर पाटील यांची नियुक्ती रोटरी जिल्हा ३१४२ चे प्रांतपाल श्री. हर्ष माकोल यांच्या हस्ते झाली.
रोटरी क्लब ऑफ दिवाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले जातात. मागच्या वर्षीचे अध्यक्ष आदित्य पाटील यांच्या काळात रक्तदान शिबिर, ठाणे जिल्ह्यातील भाल गावातील जि. प. शाळेत सभागृह बांधणे, बुरसुंगे गावातील जि. प. शाळेला नूतनीकरण करणे, घे भरारी च्या माध्यमातून १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना मार्गदर्शन, आदिवासी पड्या मधे मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, आंतरशालेय चित्रकला स्पर्धा घेतली, महिलांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा या उद्देशाने शिलाई मशिनचे वाटप आदी सामाजिक कामे करण्यात आली.
तसेच या वर्षी देखील अनेक सामाजिक कार्याची ध्येय ठेवण्यात आली आहेत असे नवनियुक्त अध्यक्ष किशोर पाटील यांच्या कडून सांगण्यात आले.