विधानसभा संयोजिका रोझलीन फर्नाडिस यांनी केले वाटप
अंबरनाथ ( नवाज वणू ) : भारतीय जनता पक्षाचे अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजीत करंजुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ विधासनभा महिला मोर्चा संयोजिका रोझलीन बेझील फर्नाडिस यांनी केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आली. त्यानंतर विश्वजीत करंजुले यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसोबत केक कापून साजरा करत विश्वजीत करंजुले यांचा रोझलीन फर्नाडिस यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व शिक्षकांना छत्र्यांचे वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. शालेय मुलांच्या मनोरंजनाकरिता जादूगरने विविध प्रकारचे खेळ व जादू दाखवून मुलांचे मनोरंजन केले.
याप्रसंगी भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील, पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजीत करंजुले, विधासनभा महिला मोर्चा संयोजिका रोझलीन बेझील फर्नाडिस, उद्योजक सुरेंद्र पाटील, खानजी धल, मंजू धल, आप्पा कुलकर्णी, सुनिता लाड, फरजाना शेख, जानवी नार्वेकर, भूमी यादव, मनीषा जेऊरकर, राखी गायन, शबनम बाटलीवाला, समाजसेविका छकुली ताई बनसोडे, पूजा बाई, सुनील वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विशेष सहकार्य केल्याने त्यांचे रोझलीन फर्नांडिस यांनी आभार मानले.