Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

मौजे शिळगांवात मोफत छत्री वाटप उपक्रम, वेदिका पाटील यांच्या हस्ते वितरण

 ठाणे :  दिनांक २२ जून २०२५ रोजी कल्याण विधानसभा मतदारसंघातील मौजे शिळगावात येथे "मोफत छत्री वाटप उपक्रम" आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे कल्याण विधानसभा सुपर वॉरियर्स विनोद वास्कर यांनी शिळ गांवातील हनुमान मंदिर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारतीय जनता पार्टीचे शिळ- दिवा युवा मोर्चा अध्यक्ष साहिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सौ. वेदिका साहिल पाटील यांच्या हस्ते महिला बचत गटातील महिलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित महिला बचत गटातील महिलांशी संवाद साधताना वैदिका पाटील म्हणाल्या की, "भारतीय जनता पक्षाच्या कार्यसंस्कृतीत सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ही संकल्पना केवळ घोषवाक्य नाही, तर ती आमच्या प्रत्यक्ष कृतीतून दिसून येते. अशा उपक्रमांद्वारे आम्ही मतदारसंघात सेवा आणि विकासाचा ठोस ठसा उमटवत आहोत."

त्या पुढे म्हणाल्या की, "सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनात थेट उपयोगी ठरणारे उपक्रम हेच खरे जनतेचे प्रतिनिधित्व आणि विकासाचे खरे प्रतिबिंब आहे. हीच आमची कार्यपद्धती आणि आमचे उद्दिष्ट आहे."

कार्यक्रमात वेदिका पाटील,उल्का पाटील,कोमल चौधरी,वास्कर, लक्ष्मी पाटील,निरा भोईर,संगीता आलिमकर जया बबन भोईर ,रेश्मा म्हात्रे,बेबीबाई काठे ,सुमित्रा साळवी,निकिता काठे सीताबाई पाटील, लतिका भोईर, कमला पाटील, बारकूबाई पाटील रूपाली वास्कर, गीता भोईर,अस्मिता आलिमकर, कांता भोईर गुणाबाई भोईर अनिता म्हात्रे जाईबाई पाटील बेबी पाटील जया आलिमकर वर्षा पाटील मनीषा भोईर,संजीवनी काठे मोनिका काठे, जया विठ्ठल भोईर , अरुणा काठे, वंदना काठे, सपना साळवी, अर्चना काठे अनिता काठे, सुलोचना आलिमकर सुनिता भोईर, आणि सर्व महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या. शिळ गावातील महिला बचत गटातील महिलांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


Design by - Blogger Templates |