उरण दि २३ ( विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील पुनाडे गावाचे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र आत्माराम पाटील आणि डोळ्यांचे डॉक्टर दिक्षा अनिकेत डाकी,अनिकेत कृष्णा डाकी, आणि प्रसिद्ध जागतिक नेत्रतज्ञ डॉ.सुहास हळदिपुरकर ह्यांच्या लक्ष्मी चेरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पुनाडे गावातील तसेच पंचक्रोशीतील गरजु आणि गरीब लोकांसाठी पुनाडे गावातील हनुमान मंदिर येथे नेत्र चिकित्सा शिबीराचे अल्प दरात आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शिंदे गटाचे रमेश म्हात्रे (संपर्क प्रमुख उरण विधानसभा),नेत्र चिकित्सा तज्ञ डॉ.श्रध्दा मामीदवार, डॉ.दिक्षा अनिकेत डाकी, शिबीराचे संयोजक विनोद पाचगेर,उपोषण सम्राट अजित म्हात्रे, काशीबाई खारपाटील (चिरनेर ),जयप्रकाश यादव,एड.रुषाली पाटील, कृष्णा डाकी, सुरेंद्र पाटील, रंजित ठाकूर, हरिश्चंद्र पाटील(केळवणे), देविदास पाटील (पुनाडे), स्वागत म्हात्रे, जिवन पाटील (सारडे),लिलाबाई पाटील आदि मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.पुनाडे गावातील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र आत्माराम पाटील हे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत.
सामाजिक बांधिलकी जपत ते नेहमी पुनाडे गावासाठी सातत्याने सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवित असतात.पुनाडे गावातील गोरगरीब जनतेसाठी देवेंद्र पाटील यांनी जनु काही मदतीचा सपाटाच लावला आहे.या सात आठ वर्षात त्यांनी पुनाडे ग्रामस्थांसाठी छत्री वाटप कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मराठी शाळेसाठी फँन, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम घेतले. तसेच सलग पाच वर्षे पुनाडे गावात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात देवेंद्र पाटील आणि मित्र परिवार साजरा करत असतात.त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून डॉ.दिक्षा अनिकेत डाकी हिने पुनाडे गावातील लोकांसाठी नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन केले आहे.
उरण तालुक्यात पुनाडे गावचे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील आणि डॉ.दिक्षा डाकी यांनी राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.