ठाणे / शिळफाटा ( विनोद वास्कर ) : २४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता कल्याण फाटा जक्शन चौकी येथे दक्ष नागरिक संघटनेने वाहतूक वरिष्ठ निरीक्षक अतुल अहिरे यांची घेतली भेट, शिळ, देसाई, दहिसर परिसरातील ट्राफिक समस्येबाबत व नियोजनशून्य कारभाराबाबत दक्ष नागरिक संघटनेने वाहतूक वरिष्ठ अधिकारी अतुल अहिरे यांची भेट घेतली. वाहतूक समस्या बद्दल चर्चा केली. दक्ष नागरिक या नात्याने पंचक्रोशीत घडणाऱ्या प्रत्येक असामाजिक व अन्यायकारक गोष्टीविरुद्ध दक्ष नागरिक संघटना ही आवाज उठवत असते. सध्या शिळफाटा व कल्याणफाटा सर्कल वरील वाहतूक कोंडीचा आम्हा सर्वांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आपल्या अयोग्य नियोजनामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.दक्ष नागरिक संघटनेचे सदस्य नेहमी पाहतो की वार्डन ट्रॅफिक सोडवण्याचे प्रयत्न करत असतात परंतू वाहतूक विभागाचे सर्व अधिकारी कारवाई करण्यात व्यस्त असतात त्यामुळे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात ही वाढत जाते.वाहतूक कर्मचारी दिवसभरात कर्तव्यासाठी ज्याठिकाणी नियुक्त असतात त्याठिकाणी ते न थांबता त्यांचा पूर्ण कळ कल्याणफाटा चौक, शिळफाटा चौक, महापे रोड व कौसा बायपास येथिल बंद पडलेला टोल येथे कारवाईच्या नावाखाली वसूली करण्याकडे असतो. याठिकाणी असेही स्पष्टपणे लक्षात येते की, शिपाई दर्जाचे पोलिस कर्मचारी व वार्डन्स सुद्धा कारवाई करताना म्हणजेच गाड्यांचे कादपत्र तपासताना दिसून येतात तसेच काही वेळेस या कामात मोबाईल फोन चा देखिल वापर होतो.
तसेच एक भयंकर प्रकार रात्रीच्या वेळेत चालतो तो म्हणजे कल्याणफाटा चौक व बायपास येथिल बंद पडलेला टोल नाका येथे Drunk & Drive च्या नावाखाली दररोज पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत वाहतूक पोलिस वार्डन्सना हाताशी घेऊन मोठ्या प्रमाणात कारवाई करतात आणि आमच्या माहीतीप्रमाणे कायद्यानुसार हे सर्व बेकायदेशिर कृत्य आहे हे सर्व त्वरित बंद करण्यात यावे.
दक्ष नागरिक संघटनेने वरिष्ठ निरीक्षक अतुल अहिरे यांच्या निदर्शनास आणून दिले.शिळ ते देसाईं,शिळ ते दहिसर, शिळ ते भारत गिअर्स वाय जंक्शन, शिळ ते महापे या सर्व मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात होत असलेली अनधिकृत पार्किंग वर कारवाई करण्यात यावी. विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात यावी. हॉटेल चालक हा मुख्य रस्त्यावर खुर्च्या टाकतो त्यामुळे ग्राहक त्या खुर्च्यावर तासान तास बसतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. शेवपुरी पान टपरी, चाय टपरी, मटन विक्रेते, चिकन विक्रेते, गॅरेज, मोटर सेल विक्रेते,शोरमा विक्रेते, मंचुरियन विक्रेता, भाजी विक्रेता व इतर व्यवसाय करणारे फूटपाथ वर व्यवसाय करत असल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही त्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या मधून चालावे लागते त्यामुळे नागरिकांचा अपघात होतो. भविष्यात असे अपघात होऊ नये म्हणून या सर्व व्यवसाय चालकांवर कारवाई करावी. या सर्व व्यवसाय करणाऱ्या चालकापासून फुटपाथ मुक्त करण्यात यावे. सर्व विषयांवर आपण गांभिर्याने लक्ष देऊन तसेच बेकायदेशिर कृत्यांना आळा घालून ट्राफिकच्या समस्येपासून नागरिकांना दिलासा द्यावा. जेणेकरून ॲम्बुलन्स मध्ये असणारे रुग्ण, अग्निशामक दलाच्या गाड्या, बस, रिक्षा मध्ये प्रवास करणारे नोकरदार, कामगार, शिक्षण घेणारे विद्यार्थी, हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्स, व्यवसाय करणारे उद्योजक वेळेवर पोचतील.
खोतबंगला (मोकाशी पाडा) येथे राहणारा तरुण स्वरूप रामदास पाटील याचा दुचाकी चालवत असताना सकाळी ६: ४० ला कल्याण फाटा सर्कल येथे टेलरच्या मागच्या टायर खाली त्याचा अपघात झाला. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटना भविष्यात घडू नये. यासाठी प्रशासनाने पावले लवकरात लवकर उचलावी. आणि कल्याण फाटा सर्कल येथे सिग्नलची व्यवस्था करावी. शिलफाटा सर्कल आणि कल्याण फाटा सर्कल येथे झेब्रा क्रॉसिंग पट्टा सुद्धा मारण्यात यावा जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना रस्ता पार करताना अडचणी होणार नाही. तसेच मुंब्रा चे प्रवासी घेण्यासाठी रिक्षा चालक शिवसेना शाखा जवळ अनधिकृत रिक्षा स्टॅन्ड चालू झाला आहे तो बंद करण्यात यावा. या अनधिकृत रिसर्च अँड मुले नवी मुंबईतून येणाऱ्या वाहन चालकांना त्रास होतो.