ठाणे : सदर रेड रन मॅरेथॉन स्पर्धेत एकूण-21 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवाला यामध्ये
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली येथे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, सिव्हिल हॉस्पिटल ठाणे यांच्या वतीने आणि जिवनदीप शिक्षण संस्था संचालित कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली यांच्या सौजन्याने रेड रन स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. रवींद्र घोडविंदे आणि ग्रामीण रुग्णालय गोवेली येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपलक्ष्मी मेश्राम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये 21 महाविद्यालयांतील 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुला आणि मुलींसाठी स्वतंत्र गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आरोग्य, शिस्त, आणि सामाजिक जागरुकतेचा सुंदर संगम घडवून आणला.
विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:
मुलांचा गट:
1. हरिओम सिंग – S.S.T. College
2. विशाल कनोजिया – S.S.T. College
3. हरिओम मौर्य – B.K. Birla College (Night)
मुलींचा गट:
1. सुजाता मुंडेकर – S.S.T. College, उल्हासनगर
2. अंकिता डी. Pal– S.S.T. College, उल्हासनगर
3. धनश्री व्ही. पडवळ – V.P.M. College, किनवली
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापकवर्ग, स्वयंसेवक तसेच जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, ठाणे यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचा उद्देश केवळ स्पर्धा नव्हे, तर HIV/AIDS विषयी जनजागृती, आरोग्य विषयक साक्षरता आणि युवकांमध्ये सकारात्मक विचारांची बीजे पेरणे हा होता.