Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

वीज नंतर अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करा ; बोअरवेल वर ही कारवाई - महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

ठाणे - : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मौजे शिळ येथील अनधिकृत बांधकामाच्या पाणी पुरवठ्याबाबत मा. उच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान अनधिकृत बांधकामांना होत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने तपास करण्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहेत.

मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने पुर्तता होण्याच्या दृष्टीकोनातून आज (गुरुवार दिनांक 24/7/2025) पाणी पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक आयुक्त दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे, विधी अधिकारी मकरंद काळे, उपनगर अभियंता विनोद पवार, सहाय्यक आयुक्त व पाणीपुरवठा ‍विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावी व बांधकाम अवैध असल्यास नळसंयोजन तात्काळ खंडीत करण्यात यावे, त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरुन अवैधरित्या नळसंयोजन घेतले असल्यास ते तात्काळ खंडीत करावे. तसेच यापुढे पाणीसंयोजन देत असताना महापालिकेच्या बांधकाम परवानगी शिवाय कोणत्याही अनधिकृत बांधकाम नळ संयोजन दिले जाणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी व यापूर्वी जी नळसंयोजने दिली आहे ती तात्काळ खंडीत करण्यात करण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधितांना या बैठकीत दिले.
अनधिकृत बांधकामांना नळसंयोजने देताना कागदपत्रे न तपासता नळसंयोजने ‍दिली असतील तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही आयुक्त सौरभ राव यांनी दिले. ठाणे महापालिकेच्या 9 प्रभागसमिती कार्यक्षेत्रातील अनधिकृत इमारतींना परवानगीसह व परवानगी शिवाय देण्यात आलेल्या नळसंयोजनाची यादी तयार करुन त्यानुसार देण्यात आलेली सर्व नळसंयोजने तोडून टाकण्यात यावी तसेच अनधिकृतपणे तयार केलेल्या बोअरवेलवरही कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

यासंदर्भात ठाणे मनपा पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रभाग समिती सहा.आयुक्त यांच्याकडून यादी घेऊन कारवाई करण्यात येईल असे म्हटलें आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |