डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून युवासेना जिल्हाधिकारी यांनी राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवसेनेचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्रव्यवहार करत पाटील यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.पक्षातील वरिष्ठांकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे कारण देत युवासेना जिल्हा अधिकारी आणि त्यांच्यासोबतच सहा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले.
2024 विधानसभा निवडणूकीनंतर मला व माझ्या सहकाऱ्यांना वरिष्ठांकडून सापत्न वागणूक मिळत असून तसेच संघटनेतील गटबाजीमुळे अत्यंत निराशा आली असल्याचे प्रतिक यांनी म्हटले आहे. निष्ठापूर्वक काम करुनही योग्य न्याय मिळत नाही. उलट पक्षपातीपणा आणि भेदभावाचा अनुभव येत आहे. यामुळे मी व माझे सहकारी राजीनामा देत असल्याचे प्रतिक यांनी सांगितले.
यावेळी प्रतिक पाटील यांच्यासमवेत डोंबिवली विधानसभा उपजिल्हा अधिकारी परेश काळण, कल्याण ग्रामीण विधानसभा समन्वयक पंकज माळी, उपतालुका अधिकारी आवेश गायकर, शहर अधिकारी प्रसाद टूकरुल, युवती शहर अधिकारी पायल शिंगोटे, युवर शहर समन्वयक ज्योती पाखरे यांनी राजीनामा दिला आहे.