Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे "कलगी-तुरा" कलेचं आयोजन

समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा "समाजरत्न पुरस्कार - २०२५" देऊन होणार गौरव

श्री.अरविंद महापदी साहेब( निवृत्त पोलिस उपायुक्त- मुंबई )यांची लाभणार उपस्थिती

मुंबई ( शांताराम गुडेकर ) : कोकणातील पारंपरिक लोककला होळी आणि गणेशोत्सव हे कोकणातील खरे खुरे उत्सव.या दोन्ही उत्सवासाठी येथील शेतकरी मोकळा असतो.भाताची लावणी संपली की घरोघरी गणपती येतात आणि भाताची कापणी /मळणी संपताच शिमग्याचे म्हणजेच होळीचे वेध लागतात.कोकणातील या दोन्ही सणांशी येथील लोककला निगडीत आहेत.शक्ती-तुरा ( जाखडी ) हा सामूहिक नृत्याचा प्रकार आहे.गणेशोत्सवात गावतल्या प्रत्येक वाडीत जाखडीचा संच असतो.आठ गडी फेर धरून वादकांच्या भोवती नाचतात.ढोलकी आणि घुंगरू ही पारंपरिक वाद्य आणि आधुनिक ढंगाची गाणी यांचा मेळ जाखडीत असतो.जाखडीत आता अनेक बदल झालेत.वेशभूषा,प्रकाश योजना,संगीत आणि वाद्यवृंद यांनी सध्याची जाखडी वेगवान आणि रंगीतसंगीत बनली आहे.आता जाखडीचा जंगी सामना जणू प्रेक्षकांसाठी पर्वणी असते.कोकणातील लोककला हीच जतन करण्यासाठी आणि रसिक मनोरंजनासाठी रायगड - रत्नागिरी असा दिग्गज शाहिरांचा जंगी मुकाबला होणार आहे.यामध्ये शक्तीवाले शाहीर प्रभाकर धोपट यांच्याविरुद्ध तुरेवाले शाहिर ज्ञानदीप भोईनकर शक्ती-तुरा रसिकांचे मनोरंजन करणार आहेत.रसिक हो आपली उपस्थिती अनमोल असून हा सामना मंगळवार दि.१५ जुलै २०२५,रोजी रात्रौ ८.३० वा.मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह,विले पार्ले,पूर्व ( मुंबई ) येथे होणार आहे.या सामन्याचे आयोजन श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) यांनी केले असून या कार्यक्रमासाठी मा.श्री.अरविंद महापदी साहेब( निवृत्त पोलिस उपायुक्त- मुंबई )यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.अधिक माहितीसाठी किंवा तिकीटसाठी ९९३०५८५१५३ /९८३३६८९६४२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

तसेच या कार्यक्रमानिमित्त सामाजिक पटलावर अधोरेखित व्हावा असा स्तुत्य उपक्रम समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा श्री पाणबुडी देवी कलमंच,मुंबई यांच्यावतीने गौरव होणार असून त्यांना "समाजरत्न पुरस्कार - २०२५" देऊन त्यांच्या कार्याचा गौरव होणार आहे.यामध्ये प्रमोदजी गांधी -( उद्योजक/संपर्क अध्यक्ष - मनसे ता. गुहागर ),रविंद्रजी मटकर -( अध्यक्ष - नमन लोककला संस्था ( रजि.),रंगनाथ गंगाराम गोरीवले - ( चिकन्या भाई )अध्यक्ष - भैरी भवानी देवस्थान कमिटी,धोंडिबा दळवी -(संचालक-श्री गुळंबाई देवी विकास सेवा सोसायटी,कळसगादे),दिनेशजी कुरतडकर-(संस्थापक - कोकण कलामंच,मुंबई,),अरविंद मोरे "माऊली"-( अध्यक्ष - श्री समर्थ कृपा भजन मंडळ (नालासोपारा -विरार ) या सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजरत्न पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमाचे निवेदन शाहीर शाहीद खेरटकर करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


Design by - Blogger Templates |