Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन (रजि.)तर्फे यशवंत केडगे "सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्कार-२०२५ ने सन्मानित

मुंबई ( शांताराम गुडेकर ) : गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन(रजि.)तर्फे सोमवारी (३० जून२०२५) रोजी सन्मा.श्री.यशवंत रघुनाथ केडगे (DYSP Sdpo Lanja Dist-Ratnagiri) हे वयानुसार पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले म्हणून सेवानिवृतीचे औचित साधुन त्यांनी पोलीस दलात असताना केलेली कामगिरी पाहून गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन- गाव गवाणे, तालुका- लांजा,जिल्हा -रत्नागिरी यांच्यावतीने

श्री.यशवंत रघुनाथ केडगे(DYSP Sdpo Lanja Dist-Ratnagiri) यांचा "सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्कार-२०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत करंबळे,उपाध्यक्ष श्री.सुभाष रामाणे,महासचिव- अमोल मेस्त्री,खजिनदार श्री.रवींद्र कोटकर यांच्य उपस्थित त्यांची पत्नी,मुले व लांजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.निळकंठ बगळे साहेब, रत्नागिरी शहरी विभागाचे पोलीस अधिकारी व हवालदार तसेच लांजा तालुक्याचे पोलीस अधिकारी व हवालदार. कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

उच्च न्यायालयाचे कर्मचारी,समाजसेवक श्री.चंद्रकांत चंद्रभागा शिवराम करंबळे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत, याशिवाय जेष्ठ नागरिक समूहाला पाणी, बिस्कीट वाटप केले जाते.गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे आणि परिवार व पदाधिकारी, सदस्य, सभासद, हितचिंतक यांच्यातर्फे कोकणात दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात.शिक्षण,समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्त, कृषीसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, पर्यावरण आदी क्षेत्रात गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे.फळाची अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत रहाणे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे यांचा मूळ उद्देश आहे.गुरुमाऊली चंद्रभागा फॉउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक यांचा या सर्व कार्यास मोलाचा सहभाग असतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


Design by - Blogger Templates |