डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली गांधीनगर टाटा पॉवर परिसर येथे पाण्याच्या व्हाल्वचे उघड्या चेबर मध्ये पडून 60 वर्षीय नाका कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना रविवार 20 तारखेला सायंकाळच्या सुमारास घडली. बाबू धर्मा चव्हाण असे मृत्यू पावलेल्या नाका कामगाराचे नाव आहे. एमआयडीसीच्या हलगर्जीपणामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलगा काशिनाथ चव्हाण याने केला आहे. हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष महादूसिंग राजपूत म्हणाले की आमच्या संघटनेचे ते सदस्य होते.बाबू चव्हाण हे कुटुंबाचा आधारस्तंभ होते. ते बेटबिगारीचे करून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत होते.
प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आमच्या कामगार मृत्यू झाला आहे. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.