Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

अंबरनाथ नगरपालिकेच्या ढिसाळ, नियोजन शून्य, भ्रष्टाचारी गोलमाल कारभाराविरोधात भाजपा अंबरनाथ शहराच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा धडकला !

अंबरनाथ दि. ११ ( नवाज वणू ) : आता भ्रष्टाचार नाही चालणार... भाजपा हिशोब मागणार... अपूर्ण रस्त्यांचे काम... जनतेचे हाल, भ्रष्टाचार हटाव... अंबरनाथ बचाव,खड्डे मुक्त अंबरनाथ हवा,पथदिवे प्रकाशमय करा... नागरिकांना हक्काच्या प्राथमिक नागरी सुविधा द्या अशा अनेक मागण्यांचे फलक हातात घेऊन भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने भाजपा राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार नरेंद्र पवार, माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे,कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, अंबरनाथ विधानसभा संयोजक अभिजीत करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहर मंडळ अध्यक्ष विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, लक्ष्मण पंत, प्रजेश तेलंगे यांच्या पुढाकाराने सोमवारी अंबरनाथ पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंबरनाथ नगरपालिका कार्यालयावर भव्य जनअक्रोश धडक मोर्चा काढण्यात आला. मात्र पूर्व सूचना देऊनही मुख्याधिकारी गायब राहिल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतिकृती बनवलेल्या पुतळ्याला चांगला चोप देऊन समाचार घेतला. दरम्यान मुख्याधिकारी यांच्या गैरहजेरीत उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांना निवेदनाद्वारे एक महिन्याचे अल्टिमेट देऊन पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अंबरनाथ शहरातील मुख्य रस्ते व उप रस्त्यांवर 'पथदिवे असून अंधार...नसून खोळंबा'असा गंभीर प्रश्न नागरिकांना सध्या भेडसावत आहे.तसेच विविध प्राथमिक नागरी सुविधांचा पार बोजवारा उडाला असून जिथे पथदिवे लावले आहेत, तिथे ९० टक्के पथदिवे बंद अवस्थेत असल्याने शहरातील रस्त्यांवर अंधारमय अवकळा पसरलाचा आरोप करत सोमवारी ११ ऑगस्ट रोजी अंबरनाथ नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर तसेच शहरवासी यांच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अंबरनाथ पूर्व-पश्चिम भागातून मोठ्या संख्येने निघालेला भव्य मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यालयावर धडकला. अंबरनाथ शहरातील रस्ते कॉंक्रिटीकरण प्रकल्पातील गंभीर त्रुटी रस्त्याच्या दुतर्फा न बांधलेले गटार तसेच उघड्या व भुयारी गटारी, स्ट्रीट लाईट तसेच स्टीट पोल्सचा अभाव नागरिकांचे झालेले नुकसान व तात्काळ नुकसान भरपाईसह कायदेशीर कार्यवाही बाबत मागणीसह स्ट्रीट लाईट लावणे बाबतचा कार्य अहवालाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अंबरनाथ रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामात मनमानी कारभार करीत कामे पूर्ण न करता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत कामांची बीले काढण्यात आली. एवढे कमी की काय म्हणून त्याच कामांच्या परत निविदा काढून अजून भ्रष्टाचार करण्यात आला .एवढे होऊनहीं अंबरनाथकरांच्या नशिबी मात्र निकृष्ट दर्जाचे , पथदिव्याविना,गटारीविना रस्ते प्रशासनाने माथी मारले.कचऱ्यामध्ये देखील अशाच प्रकारे अनागोंदी प्रकार सुरू आहे. खड्ड्यांनी चाळण झालेल्या आणि अंधकारमय रस्त्यांवर रहिवाशांना वाटचाल करावी लागत आहे याचा अंबरनाथ मधील नागरिकांना नाहक त्रास होऊन महिलांचे छेडछाड चोरी अपघात आणि गुन्हेगारीत देखील वाढ झाली आहे या सर्व बाबींची दखल घेत प्रशासनाने महिन्याभरात खड्डेमुक्त रस्ते आणि संपूर्ण अंबरनाथ शहरातील रस्त्यांवर पथदिवे लावून अंबरनाथकरांना दिलासा द्यावा व या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा महिनाभरात यापेक्षाही उग्र आंदोलनास प्रशासनास सामोरे जावे लागेल आणि त्यावेळेस नगरपालिकेला टाळे लावून सर्व अधिकारी व मुख्याधिकारी यांना नगरपालिका बंदी करण्यात येईल त्यावेळी होणाऱ्या परिणामांची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासन आणि मुख्याधिकारी यांची राहील असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी सरचिटणीस दिलीप कणसे, आप्पा कुलकर्णी, विधानसभा महिला मोर्चा संयोजिका डॉ. रोझलीन बेझील फर्नांडिस, रूपाली लठ्ठे, संतोष शिंदे, अजित खरात, माजी नगरसेवक हिरालाल गुप्ता, लालमन यादव, रोहित महाडिक, खानजी धल, दत्ता देशमुख, दीपक कोतेकर, आतिश पाटील, विजय सुर्वे, शिवशंकर रेड्डी, अरबाज खान, अनिल गायकवाड, आदित्य गायकवाड, किशोर शिंदे, ईश्वर गुंजाळ, राजेश पांडे, ओमकार काळे, रामन वैती, राजू निराला, लक्ष्मी चव्हाण, कुलदीप चोप्रा, मनीष गुंजाळ, कंचन मिश्रा, पौर्णिमा जाधव, पूजा रणदिवे, श्रद्धा गुंजाळ, ज्योती डोंगरे, रीना मोरे, कृष्णाबा सिसोदिया, साहिल नाडकर, शेफाली नाडकर आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारो नागरिक मोर्चाला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |