डोंबिवली ( शंकर जाधव ) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मिलिंद एकबोटे यांनी आक्षेपार्य विधान केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट ) ने डोंबिवलीत निषेध आंदोलन केले. या आंदोलनात पदाधिकाऱ्यांनी एकबोटे यांच्या बॅनर वरील फोटोवर जोडो मारो आंदोलन केले.
डोंबिवली विधानसभा व कल्याण ग्रामीण विधानसभा यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. महिलांनी यावेळी 143 विधानसभा डोंबिवली शहरअध्यक्ष सुरेश जोशी,विधानसभा डोंबिवली शहर उपाध्यक्ष कुणाल जोशी, डोंबिवलीशहर सरचिटणीस मिलिंद भालेराव, 144 विधान सभा अध्यक्ष ब्रह्मा माळी, जिल्हाध्यक्ष डाॅ.विनय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुरेय्या पटेल, युवक अध्यक्ष शशिकांत म्हात्रे, योगेश म्हात्रे ,शशिकांत तांडेल,दिपक ठाकुर,डॉ.मंजु विनय पाटील,मंगेश जाधव, युवक जिल्हा अध्यक्ष तुषार म्हात्रे, युवक जिल्हा सचिव ज्ञानेश्वर आलम, जितेंद्र घरकुंडाले, जनार्दन गुरव ( सेवादल ) इतर पदाधिकारी उपस्थित होते.
एकबोटेविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारे निवेदन डोंबिवली रामनगर पोलिसांना देण्यात आले.