मुंबई : घाटकोपरच्या पूर्वेला असलेल्या गणेश संस्थानच्या मंदिरात अंगारकी उत्सवानिमित्त शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ईशान्य मुंबई विभागप्रमुख सुरेश पाटील यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
यावेळी उपविभागप्रमुख अजित भायजे,विधानसभा कार्यालयप्रमुख प्रकाश वाणी, विधानसभासंघटक अशोक वंडेकर,प्रसाद कामतेकर,भूषण चव्हाण, शाखाप्रमुख मयुरेश नामदास,संजय कदम, शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे,शाखासंघटक चंद्रकांत हलदणकर,रमेश सावंत,वसंत पाटील,शैलेश यादव,विलास मयेकर,विजय राणे आदी उपस्थित होते.