दिवा : दिवा शहर हा ठाणे महानगरपालिकेतील वेगाने विकसित होत असलेला आणि लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रभाग बनला आहे. शहरात वाढणारी लोकसंख्या, वाढती वाहनांची संख्या आणि रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग अतिशय जास्त झाला आहे. विशेषत दुचाकीस्वार व रिक्षाचालक भरधाव वेगाने वाहन चालवताना दिसून येतात. या अनियंत्रित वाहतुकीमुळे स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घ्यावा लागतो. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना वाहनांच्या कर्कश आवाजाचा व धोकादायक वेगाचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत काही दुचाकीस्वार हे जाणीवपूर्वक कर्कश आवाज करत वाहन चालवत असल्याने आवाज प्रदूषणही वाढले आहे. मागील काही दिवसांमध्ये अपघातांची संख्या वाढली असून, नुकत्याच एका दुर्घटनेत अपुऱया गतीरोधक व वाहतूक नियंत्रण अभावामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा काही दिवांपूर्वीच मृत्यू झाला. ही बाब अत्यंत गंभीर असून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी योग्य ती कार्यवाही आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यासंदर्भात वाहतूक पोलीस उपायुक्त श्री. पंकज शिरसाठ यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, युवा सेना शहर अधिकारी अभिषेक ठाकूर , महीला आघाडी शहर समन्वयक प्रियांका सावंत, विभाग प्रमुख चेतन पाटील, सचिन पारकर, उपविभाप्रमुख नितीन सावंत, नागेश पवार, तुषार सावंत उपस्थित होते .