डोंबिवली ( शंकर जाधव ) गोकुळाष्टमीच्या पूर्व संध्येला शिवसेना डोंबिवली शहरशाखेच्या वतीने पूर्वेकडील आप्पा दातार चौकात भव्य दहीहंडी सराव आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोविंदा पथकाने ' मी मराठीचा, महाराष्ट्राचा' फलक हातीघेतले होते. आमदार राजेश मोरे,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश मोरे, लता पाटील, माजी नगरसेवक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
या सराव हंडी सोहळ्याला मोठ्या संख्येने गोविंदा पथकाने हजेरी लावून दहीहंडी फोडण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.डोंबिवलीत शिवसेना सेनेच्या सराव दहीहंडीचा यंदा प्रथमच ढाक्कुमाकुम'चा गोविंदा दणाणला. सराव दहीहंडीचे आयोजन फडके रोडवरील मदन ठाकरे चौकात केले होते.
या सराव दहीहंडी सोहळ्याला कल्याण, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, दिवा, अंबरनाथ, उल्हासनगर या भागातील गोविंदा पथकांनी हजेरी लावून दहीहंडीला सलामी दिली. दहीहंडीला सलामी देणाऱ्या गोविंदाना स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.