ठाणे, दि.04 :- कोवीड - 19 या साथीच्या रोगाने ज्या बालकांचे आई वडीलांचे निधन झाले आहे. अशा बालकांसाठी PM CARE FOR Children या योजने अंतर्गत महिला व बाल विकास विकास विभाग, भारत सरकार यांच्याकडून अर्थ सहाय्य मंजूर करण्यात येत आहे.
कोवीड - 19 या साथीच्या रोगाने श्री. अमनजीत सिंह यांच्या आई वडीलांचे निधन झाले होते व त्यांना महिला व बाल विकास विकास विभाग, भारत सरकार यांच्या मार्फत अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आले होते व अर्थ सहाय्याची रक्कम मुदतठेव म्हणून पोस्ट खात्यात ठेवण्यात आली होती.
श्री. अमनजीत सिंह यांची पोस्ट खात्यामध्ये ठेवलेल्या अर्थ सहाय्य रकमेची मॅच्युरिटी दि.4 ऑगस्ट 2025 रोजी पूर्ण झालेली असून जिल्हाधिकारी, ठाणे श्रीकृष्णनाथ पांचाळ, (भा.प्र.से.) यांच्याहस्ते दि. 4 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4.00 वा. त्यांना रु. 10 लाख चा धनादेश देण्यात आलेला आहे.
श्री. अमनजीत सिंह हे देशातील मुलांमधून पहिले लाभार्थी असून महाराष्ट्र राज्यातील पहिलेच लाभार्थी आहेत. ज्यांना वयाची 23 वर्ष पूर्ण होवून अर्थ सहाय्याची रक्कम धनादेशाव्दारे रक्कम अदा करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, (भा.प्र.से.), भारतीय पोस्ट विभाग, वरिष्ठ अधीक्षक के. नरेंद्र बाबू, ठाणे,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता विजय शिंदे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, ठाणे, रामकृष्ण रेड्डी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष ठाणे संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) पल्लवी जाधव, पोस्ट मास्टर राजीव हॉलीगोल, उप पोस्ट मास्टर सी. बी. बडगे, जनसंपर्क अधिकारी आर. एस. बोमबडे, जि. या. सं. कक्ष, ठाणे माहिती विश्लेषक उमेश आहरे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष ठाणे बहुउद्देशीय कार्यकर्ता कृष्णा मोरे हे अधिकारी उपस्थित होते, असे ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिदे यांनी कळविले आहे.