Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

नारी सन्मान : जि प शाळा क्र ३ पारोळा येथे स्वयंपाकीण ताई यांच्या हस्ते ध्वजारोहन

पारोळा : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन यावेळी पुर्ण देशात ध्वजवंदनाला खुपच महत्व असते . प्रत्येक भारतीय नागरिकाची इच्छा असते की जीवनात एकदा तरी आपल्याला सार्वजनिक रित्या या प्रसंगी तिरंगा फडकविण्याचा मान मिळावा . पण हे सर्वांनाच शक्य होत नाही . ग्रामिण असो की शहरी भाग अशा ठिकाणी पदाधिकारी व अधिकारी यांनाच ही संधी मिळते .

पण जि प प्राथ शाळा क्र ३ चे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे हे गेल्या १३ वर्षापासुन नारी सन्मान म्हणुन समाजातील विविध मातांना ही संधी देतात . सैनिक माता , कष्टकरी अपंग युवती, कष्टातुन पदविधर झालेली युवती , विधवा माता अशा विविध महिलांना ते हा सन्मान व संधी मिळवुन देतात . याच धरतीवर आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहनाचा मान त्यांनी शाळेच्या स्वयंपाकिण ताई नयना मराठे यांना दिला .

नयना ताई ह्या रोज अतिशय छान रुचकर व स्वादिष्ट असा शालेय पोषण आहार तर बनवितातच पण शालेय स्वच्छता व विद्यार्थ्यांचीही खुपच काळजी घेतात . आपल्या कामाप्रती , शाळेप्रती व विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांचा हा समर्पित भाव बघुन त्यांना हा सन्मान देण्यात आला .

त्यांना अगोदर संकोच वाटला पण नंतर आपल्याला ध्वजारोहनाचा मान मिळाला याचा मनस्वी आनंद ही झाला .

या वेळी शाळेच्या सर्व विदयार्थ्यांसह अर्चना सेवलीकर , तरन्नुम सैयद , दिपाली पाटील , सुरेखा निकम , नुतन पाटील , योगिता सोनार , वंदना कासार , रुकसार मेहतर व आशा कासार हे उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |