उरण दि १३ ( विठ्ठल ममताबादे ) : भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रविवार दि १४ सप्टेंबर २०२५ रोजी भिवंडी ते जासई (उरण तालुका )असे नवी मुंबई मार्गे “दिबा मानवंदना कार रॅली” चे आयोजन करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील साहेबांचे नाव देण्याच्या मागणीकडे केंद्र/राज्य सरकारचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रॅली ही भिवंडी माणकोली येथून सकाळी ९ वाजता प्रस्थान करणार असून नवी मुंबईतून पुढे जासई करिता मार्गस्थ होणार आहे त्या धर्ती वर नवी मुंबई आणि लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या त्यागातून १२.५% भूखंडाचा लाभ घेतलेल्या आणि प्रत्येक दिबा प्रेमींना आयोजकांमार्फत आवाहन करण्यात आले आहे की दिबा साहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने रॅली चे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहावे आणि रॅली मध्ये सहभागी व्हावे
मार्गिका नियोजन आणि वेळ:-
दिबा मानवंदना रॅली
रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५
प्रस्थान स्थळी जमण्याची वेळ सकाळी ९ वाजता
भिवंडी माणकोली- प्रस्थान वेळ सकाळी १० वाजता
स्वागत स्थळे आणि जॉइनिंग पॉइंट
- 1. रेती बंदर खारीगाव (खारीगाव ग्रामस्थ) - जॉइनिंग स्पॉट- शीळ डोंबिवली कडील वाहने - सकाळी १०.२० वा
- 2. कळवा नाका - (कळवा ग्रामस्थ) - जॉइनिंग स्पॉट- ठाणे शहर आणि घोडबंदर रोड वरील वाहने - सकाळी १०.४० वा
- 3. दिघा रेल्वे स्थानका समोर (विटावा, आनंद नगर, दिघा ग्रामस्थ) - सकाळी ११ वा
- 4. ऐरोली सिमेन्स कंपनी समोर (ऐरोली आणि दिवा ग्रामस्थ) - सकाळी ११.१५
- 5. रबाळे रेल्वे स्थानका समोर ( रबाळे, गोठिवली, आणि तळवली ग्रामस्थ) - जॉइनिंग स्पॉट- मुलुंड ऐरोली मार्गे येणारी वाहने - सकाळी ११.२५
- 6. घणसोली नाका ( घणसोली ग्रामस्थ)- सकाळी ११. ३५ वा
- 7. DAKC रिलायन्स गेट (कोपरखैरणे आणि महापे ग्रामस्थ) सकाळी ११.४५ वा
- 8. कोपरी गाव हनुमान मंदिर (कोपरी, पावणे, बोनकोडे आणि जुहूगाव ग्रामस्थ) दुपारी १२.०० वा
- 9. अरेंजा सर्कल वाशी (तुर्भे, सानपाडा, वाशी ग्रामस्थ) दुपारी १२.१०
- 10. नेरूळ प्रशांत कॉर्नर सिग्नल ( जुईपाडा, शिरवणे, सारसोळे, कूकशेत) जॉइनिंग स्पॉट- मुंबई कडून येणारी वाहने, - दुपारी १२.२५
- 11. करावे चाणक्य सिग्नल (नेरूळ, दारावे आणि करावे ग्रामस्थ) - दुपारी १२.३५
- 12. नवी मुंबई पालिका मुख्यालय (बेलापूर, शहाबाज, अग्रोली आणि दिवाळे ग्रामस्थ) - दुपारी १२.४५
- 13. दिबा पाटील विमानतळ रेतीबंदर गेट (जॉइनिंग स्पॉट उलवे कडून येणारी वाहने) - दुपारी १ वा
- 14. चिंचपाडा ब्रिज खाली (चिंचपाडा आणि पनवेल ग्रामस्थ) जॉइनिंग स्पॉट पनवेल कडून येणारी वाहने - दुपारी १.१५ वा
- 15. मोठा ओवळा गाव ( पारगाव ओवळा ग्रामस्थ) - दुपारी १.२५ वा
- 16. जासई - लोकनेते दिबा पाटील मंगल कार्यालय- समारोप - दुपारी २.०० वा
