डोंबिवली ( शंकर जाधव ) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर येथे 'एक पेड मां के नाम' उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी विश्वकर्मा मित्र मंडळाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक साई शेलार, कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, डोंबिवली शहर उपाध्यक्ष, राजु शेख, चंद्रकांत पगारे, मिलिंद चकवे, सागर कांबळे आदि उपस्थित होते.
'झाडे लावा झाडे जगवा' हे आपल्या पर्यावरणाकरता उत्तम असून प्रत्येकाने एक झाड लावू ते जगवावे असे यावेळी सांगण्यात आले.
