कल्याण : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी व निरोगी आरोग्यासाठी सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत बुधवार 17 तारखेला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार सुलभा गायकवाड,कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली व मराठा कोळसेवाडी मंडळ अध्यक्ष विजय उपाध्याय यांच्या नियोजनाने मंदिरात होम-हवन व प्रभू रामनगर परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
पंतप्रधान मोदीजींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अजूनही अनेकों यशस्वी वर्षांची साथ लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे यावेळी अभिमन्यू गायकवाड म्हणाले.