कल्याण ( शंकर जाधव ) : कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील गौरी- गणपतींचे काल मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. पीओपीच्या १६०६९ आणि शाडूच्या ८५०३अशा २४५७२ गौरी गणपतींचे विसर्जन झाले.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार ६ फुटापेक्षा कमी उंचीच्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन, कृत्रिम विसर्जन स्थळी करणेबाबत महापालिकेने केलेल्या-सततच्या आवाहनानुसार, जनजागृतीनुसार बहुसंख्य श्री गणेश भक्तांनी / नागरिकांनी महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांत/ कृत्रिम विसर्जन स्थळांवर आपापल्या मूर्तींचे विसर्जन केले.महापालिकेने सर्व विसर्जन स्थळांवर ठेवलेल्या चोख व्यवस्थेबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सर्व विसर्जन स्थळी सुमारे ६८ टन निर्माल्य संकलित झाले. हे निर्माल्य मा.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचा खत प्रकल्प, गणेश मंदिर डोंबिवली येथील खत प्रकल्प तसेच महापालिकेचे बायोगॅस प्रकल्प व खत प्रकल्प येथे पाठविण्यात आले.