ठाणे दि. २५ – अंत्योदयाचे प्रणेते आणि उत्कृष्ट संघटक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पार्किंग प्लाझा येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी लेखा अधिकारी महाराष्ट्र जीवन उन्नती अभियान स्वप्ना हिरवे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (सनियंत्रण) आरती घगे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी हर्षद मोरे, विस्तार अधिकारी विजय थोरात, संतोष पांडे तसेच जिल्हा व्यवस्थापक (महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान) सारिका भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा ध्यास घेत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याच्या त्यांच्या विचारांचा आदर्श अंगीकारण्याची प्रतिज्ञा केली.
