Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

महाराष्ट्रात प्रथमच क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्ष कार्यान्वित

ठाणे : अलीकडच्या काळातील सायबर गुन्हयांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे संकल्पनेतून ठाणे पोलीस आयुक्तालयात होणाऱ्या सायबर गुन्हयांचे तपासाकरिता प्रत्येक पोलीस ठाण्यात यापुर्वी सायबर कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच सदर गुन्हयांचे तपासाकरिता सायबर तज्ञ आवश्यक असल्याची बाब लक्षात घेवून त्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन सायबर तज्ञांची नेमणूक केली आहे.

सायबर गुन्हयांचा तपास करत असताना असेही आढळून आले की, गुन्हेगार गुन्हयांतील रक्कमेचा क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून अपहार करत आहेत. त्यामुळे अपहारित रक्कमेचा माग काढणे व ती रक्कम हस्तगत करणे अवघड जात आहे. अशा परिस्थितीत क्रिप्टोकरंसी संबधीत तज्ञांची आवश्यकता लक्षात घेवून पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात प्रथमच सायबर पोलीस ठाणे येथे 'क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्षाची' बुधवार दिनांक २४/०९/२०२५ रोजी स्थापना करून कक्षाचे उद्घाटन केले आहे.

सदर कक्षामध्ये आर्थिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्यातील क्रिप्टोकरंसीबाबत विशेष प्राविण्य असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदरचे अधिकारी पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये सायबर गुन्हयांचा तपास करणाऱ्या सर्व तपास अधिकाऱ्यांना क्रिप्टोकरंसी संबधाचे प्रशिक्षण देणार असून तपासातही मदत करणार आहेत. त्यामुळे फसवणूकीच्या गुन्हयांना मोठया प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |