अतनूर / प्रतिनिधी : नवरात्री हा देवी दुर्गाच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा नऊ रात्रींचा सण आहे, जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. वर्षभरात दोन मुख्य नवरात्री साजरी केल्या जातात: चैत्र नवरात्री (वसंत ऋतुमध्ये) आणि शारदीय नवरात्री (आश्विन महिन्यात). हा सण नऊ दिवस चालतो आणि दहाव्या दिवशी विजयादशमी (दसरा) साजरा केला जातो. हा सण दैवी स्त्रीशक्तीचा आदर करण्यासाठी साजरा केला जातो.
जळकोट तालुक्यातील २८ गाव, वाडी, तांडा, वस्ती सह या भागात प्रसिद्ध असलेल्या आई तुळजाभवानी देवी माता मंदिरात अतनूर ह्या गावामध्ये आज पासून नवरात्री ची सुरुवात होते आहे. या मातेचे दर्शन घेण्यासाठी पंचकोशीतून महिला भक्तगणासह सर्व भाविक भक्त नऊ दिवस उपवास करून आईच्या दर्शनाकरिता चालत येऊन या आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतात. तसेच गतवर्षी बोललेले पण नवस केलेले फेडले ही जातात व पुढील वर्षात महिला भक्तगणासह, भाविक भक्त नवसही बोलतात.