कल्याण ( संजय कांबळे ) : ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, भिंवडी, उल्हासनगर, शिळफाटा, अंबरनाथ, बदलापूर, यासह शहापूर, कल्याण ग्रामीण,आणि मुरबाड या ग्रामीण भागात देखील वाहतूक कोंडी चा प्रश्न सोडविण्यात फडणवीस सरकार सपशेल अपयशी ठरले असून यामध्ये एका २वर्षाच्या चिमुरडीचा रुग्णवाहिकेतच दुर्दैवी मृत्यू झाला, विशेष म्हणजे अजून किती बळी ही शासकीय यंत्रणा घेणार आहे. असा सवाल विचारला जात असून या विरोधातील नागरिकांचा प्रंचड असंतोष येत्या निवडणूकातून व्यक्त होणार का?हा खरा प्रश्न आहे.
सध्या ठाणे जिल्ह्यात खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे, जिल्ह्यातील मुख्य रस्ते असो अथवा अंतर्गत रस्ते असो खड्डे नाहीत असा रस्ता शोधून सापडणार नाही, अशातच, मेट्रो, किंवा इतर कामे वर्षानुवर्षे सुरू आहेत, यात रस्त्यावरील अतिक्रमण आहेच?कल्याण मुरबाड, कल्याण भिंवडी, कल्याण पनवेल, शिळफाटा, भिंवडी ठाणे, भिंवडी वाडा, या रस्त्यावर ट्रापिकनाही असे कधी झाले नाही, विशेष म्हणजे या सगळ्याचा वाहनचालक, विद्यार्थी, नागरिक, जनता यांना भयानक त्रास होत असला तरी ट्रापिकपोलिसांकडून दंड वसूल करण्यात कुठेही हे कमी पडत नाहीत, सोबतीला टोल आहेच, आतापर्यंत खड्ड्यामुळे शेकडो तरुण, तरुणी,विद्यार्थी, वयोवृद्ध, बापलेख, बहिणभाऊ,चा बळी गेला आहे, परंतु नुकतेच २वर्षाच्या चिमुरडीला वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णवाहिकेतच मृत्यू ला सामोरं जावं लागलं हे चिड निर्माण करणार नाही का?ही रुग्णवाहिका तब्बल ५तास ट्राफिक मध्ये अडकली होती. याला जबाबदार कोण?
वाहतूक पोलीस, महसूल अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी, कृषी, वन, बांधकाम अशा सर्वच विभागाचे 'लोकसेवक,हे सत्ताधा-यांचे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकत्याप्रमाणे वागत असतील तर दुसरे काय होणार?
कल्याण, शहाड, गोवेली, मामणोली, अंबरनाथ, मुरबाड, डोंबिवली, शिळफाटा, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, मिरा भाईंदर, भिवंडी हे वाहतूक कोंडी चे हाँसस्पाँट ठरत आहेत.
जिल्ह्यात डझनभर आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधी असताना नागरिकांना वाहतूक कोंडी, खड्डे, गुन्हेगारी, छेडछाड, विनयभंग, हाणामारी, मारामारी,आदी विविध अडचणी, समस्यांना सामोरं जावं लागत आहे. यामुळे लोकामध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे, तो येत्या निवडणुकीत मतदानातून व्यक्त होईल असे जाणकार बोलत आहेत.(फोटो)*