उरण दि २१ ( विठ्ठल ममताबादे ) : कोकणातील कोकण मराठी साहित्य परिषद(कोमसाप )ही सुप्रसिद्ध साहित्य परिषद आहे.त्या परिषदेच्या सन्मानाच्या विश्वस्त पदी कोकणातील लाडके व्यक्तिमत्त्व साहित्यरत्न रायगडभूषण तसेच उरण तालुक्याचे सुपुत्र प्रा.एल.बी.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ते कोमसापच्या स्थापनेपासून संघटनेत विविध पदांवर कार्यरत राहिलेले आहेत.२१वर्षे शाखाध्यक्ष,सोबत१८वर्षे जिल्हाध्यक्ष, ३वर्षे कार्याध्यक्षपद त्यानंतर विद्यमान जनसंपर्क प्रमुख म्हणून सेवा केली आहे. सेवा काळात कोकणातील साहित्यिकांचे आवडते व्यक्तिमत्त्व राहिलेले आहेत.आज त्यांना कोमसापच्या सन्मानपदी त्यांची पद्मभूषण मधु मंगेश कर्णिक, कोमसाप कार्यकारिणी, आणि कोमसाप जनरल सभेतर्फे त्यांची नियुक्ती करण्यात आल्याने उपस्थितांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.हा कार्यक्रम कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे कोमसाप अध्यक्ष नमिता कीर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कोमसाप जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ आणि जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी यांनी सांगितले की एल.बी.सरांचे सातत्याने साहित्य लेखन, कविसंमेलनात योग्यस्थानी सहभाग,कवींना मार्गदर्शन, सोबत सामाजिक कार्यात ते सहभागी राहिले आहेत.आपल्या कविमित्रांच्या,माजी आमदार विवेक पाटील,खोपटेग्रामस्थ इत्यादीच्या सहकार्याने खोपटेच्या सात गावांना नळपाणी योजना आणणे,सेझ विरोधात --उरण मैदानासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स सोबत राहून सिडको विरोधात कवींचा जागर करणे,शहरातील लेडिजबार बंद करणे, आगरी समाजातील दारूच्या मांडवप्रथे विरोधात ४५ वर्षे लढा चालू ठेवणे, पतीच्या मृत्यूनंतर विधवांचे सौभाग्यालंकार उतरवू नयेत त्याबाबत मागील २० वर्षांपासून त्या विरोधात प्रचार करणे,उरणातील प्रत्येक चळवळीत सहभागी होणे,आगरी बोलीच्या प्रचारात अग्रस्थानी राहणे इत्यादी कामे ते करीत राहिले आहेत.त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे कोमसाप ज गुंजाळ, कोळी यांनी आमच्या प्रतिनिधीपुढे मत व्यक्त केले आहे.