डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील आजदे पाडा येथे साईराज मित्र मंडळाच्या वतीनेसालाबादप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सव साजरा होत आहे.
या मंडळाची स्थापना २००४ साली जनार्दन काळण यांनी केली. यावर्षीचा या उत्सवाचे हे २२ व वर्ष आहे. देवीची ही स्थापित केलेली मूर्ती अत्यंत सुंदर, सुबक व आकर्षक असून ती अष्टभुजाधारी आहे. नवरात्र उत्सवाच्या दरम्यान मंडळातर्फे सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांच आयोजन करण्यात येतं तसेच विविध स्पर्धांच आयोजन केले जाते. विविध स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देण्यात येतात. महिलांसाठी लकी ड्रॉ च्या माध्यमातून पैठणी आणि चांदीचं नाणं दिले जाते.
येथील नवरात्र उत्सवात संस्थापक अध्यक्ष जनार्दन काळण, अलका काळण, ऋषिकेश काळण, देवेन कळण, अजय काळण, उदय वगळ, आशिष अदाते, संगीता काळे, रेखा वगळ यांसह अनेकजण अथक मेहनत घेत असतात.
