डोंबिवली ( शंकर जाधव) : डोंबिवली १४३ डोंबिवली विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी यांच्या प्रयत्नाने डोंबिबली पश्चिम प्र.क्र. २१- शांताराम टॉवर ते क्रॉस रोड आणि नटराज दर्शन,अमर जीवन ते आशा निवास रस्त्याच्या काँक्रीटीकरण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
सदर निधी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या खासदार निधीतून देण्यात आला आहे.१४३ डोंबिवली विधानसभा उपाध्यक्ष कुणाल जोशी,समाजसेवक परीतोष जोशी,ऍड ब्रम्हा माळी,विनय पाटील,मंजू पाटील,शशिकांत म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
