Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

रासरंग – २०२५ शारदीय नवरात्र उत्सवाचा होणार थाटामाटात शुभारंभ... डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांचा उपक्रम


डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार व कार्यसम्राट डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला रासरंग – शारदीय नवरात्र उत्सव यावर्षी १० व्या वर्षात पदार्पण करत असून २२ सप्टेंबर २०२५ ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी डी.एन.सी. रोडवरील शाळेच्या मैदानावर भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २०१७ पासून डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाचे आयोजन होत आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्राशी निगडीत उपक्रम राबवणारे हे फाऊंडेशन सर्वसामान्य जनतेसाठी सेवाभावी कार्य करत असून, त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे हा रास रंग नवरात्र उत्सव होय.


सदर नवरात्र उत्सवाची घटस्थापना २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता होणार असून देवीची आरती दररोज सकाळी ११:०० वाजता आणि संध्याकाळी ७:०० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे.या नवरात्र उत्सवाचा उद्घाटन सोहळा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार माननीय श्री राजेश मोरे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माननीय श्री गोपाळ लांडगे तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता नऊ रंगी फुगे आसमंतात सोडून करण्यात येणार आहे.
दररोज रात्री साडे आठ वाजता विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मानउपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

या उत्सवामध्ये महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे २८ सप्टेंबर दुपारी ३ वाजता भोंडला सोहळा आणि ३० सप्टेंबर दुपारी ३ वाजता कुमारीका पूजन / कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे विनम्रपणे आवाहन महिला आघाडी जिल्हा संघटक लता पाटील व त्यांच्यासोबत असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दररोज सायं. ७:३० ते रात्री १० पर्यत प्रसिद्ध तबलावादक व संगीतकार नैतिक नागदा यांच्या ऑर्केस्ट्राद्वारे दांडिया-गरबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. डोंबिवली शहरासह अनेक शहरांतील युवक-युवती मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होण्यासाठी नवरात्र उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. रास रंग - २०२५ नवरात्र उत्सवासाठी येणाऱ्या मान्यवर मंडळी, दुर्गा भक्त व दांडिया प्रेमींच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था डीएनसी रोडवरील श्री स्नेहांकित मित्र मंडळाच्या कमानी शेजारील भूखंड, कलावती आईच्या मठासमोर या ठिकाणी करण्यात आलेली असून दुचाकी, चार चाकीने येणाऱ्यांनी इतर ठिकाणी पार्किंग करून रहदारीस अडथळा न करता या पार्किंग व्यवस्थेचा लाभ घ्यावा.

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजामध्ये राबविण्यात येणारे आरोग्य सेवा, शिक्षण, क्रीडा प्रोत्साहन, महिला सबलीकरण, सांस्कृतिक जतन आणि धार्मिक एकोपा यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विकास करून कायापालट घडवून आणणाऱ्या डॉ. शिंदे यांचे योगदान आणि जनतेवरील प्रेम या उत्सवाच्या माध्यमातून अधोरेखित होत आहे.

या शारदीय नवरात्र उत्सवात जास्तीत जास्त दुर्गाभक्त, युवक-युवती, महिला आणि गरबा-प्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांच्यावतीने डीएनसी शाळेच्या मैदानावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. 

यावेळी पत्रकार परिषदेसाठी शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार माननीय श्री राजेश मोरे, शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, उपजिल्हाप्रमुख आणि जेष्ठ नगरसेवक रवी पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ, युवा सेना डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, ज्येष्ठ नगरसेवक नितीन पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजन मराठे, ज्येष्ठ नगरसेवक रणजीत जोशी, माजी नगरसेवक संजय पावशे, माजी नगरसेविका सारीका चव्हाण, जिल्हा संपर्कप्रमुख विवेक खामकर, शिवसेना कल्याण तालुका सचिव बंडू पाटील, कल्याण ओपन तालुकाप्रमुख आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गजानन मोतीराम पाटील, युवा सेना जिल्हा सचिव राहुल म्हात्रे, शहर सचिव संतोष चव्हाण, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक उज्वला भोसले, महिला आघाडीच्या केतकी पोवार, माजी नगरसेवक तथा खासदार कार्यालयाचे प्रकाश शांताराम माने तसेच शिवसेना महिला आघाडी युवा सेनेचे अनेक मान्यवर महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |