कार्यक्रमाला प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांची उपस्थिती
अंबरनाथ दि. २० ( नवाज वणू ) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक व आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले व पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ पूर्वेकडील आंबेडकर नगर येथे करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महिला मोर्चा विधानसभा संयोजिका डॉक्टर रोझलीन बेझील फर्नांडिस यांनी केले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी उपस्थिती लावली होती, कार्यक्रमाची सुरुवात आकाशात फुगे सोडून करण्यात आली. करंजुले यांचे स्वागत डॉक्टर रोझलीन बेझिल फर्नांडिस यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता अभियानाचे देखील आयोजन करण्यात आले होते. तर गरजू विद्यार्थ्यांकरिता मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, विधानसभा संयोजिका डॉ. रोझलीन बेझील फर्नांडिस, नगरपालिकेचे उपखातेप्रमुख संदीप खोजे, कामालकांत बनसोडे, आप्पा कुलकर्णी, सुनिता लाड, मंजू धल, प्रविण महाजन, सुनील वाघमारे, रेखा राजगुरू, फरजाना शेख, भूमी यादव, राखी गायन, आदित्य राम यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक, शहरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोजिका डॉ. रोझलीन बेझिल फर्नांडिस यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.