उरण दि ७ ( विठ्ठल ममताबादे ) : तमाम शिवसैनिकांच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शनिवार दिनाकं ०६ जानेवारी २०२५ रोजी शिवसेना उरण शहर शाखेत व माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयात माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर व उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच उरण तालुक्यातील व शहरातील तमाम शिवसैनिकांनी उरण शहर शाखेत येऊन भावपूर्ण आदरांजली वाहिली.यावेळी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
यावेळी शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष परमानंद करगुटकर, महिला आघाडी च्या उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संघटिका श्रीमती सुजाता गायकवाड, संपर्क संघटिका श्रीमती वंदना पवार, शहर संघटिका मेघा मेस्त्री, उपशहर संघटिका माधुरी चव्हाण, शाखा संघटिका सौ संगीता लोळगे, संजना कोष्टी, दीप्ती लोळगे, रेश्मा भोईर, माजी पदाधिकारी निरंतर कदम, सूर्यकांत दरणे, पप्पू काठे, उरण पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, शाखाप्रमुख अजय म्हात्रे, सचिन पाटील, अनिल पाटील, श्री गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संदेश पाटील, सुशांत तांडेल, संदीप पाटील, नंदू पाटील, संजय मेश्राम व सर्व कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
