Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

उरण मधील शिक्षक अजित जोशी यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


उरण दि ७(विठ्ठल ममताबादे ) : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. २०२५/२६ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हाभरातील १७ शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे.


भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिवस दरवर्षी शिक्षक दीन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. रायगड जिल्ह्यातील १७ शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.


आदर्श शिक्षक पुरस्कार मध्ये रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पिरकोन गावचे सुपुत्र शिक्षक अजित जोशी यांना रायगड जिल्हा परिषदे तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणार असल्याचे जाहीर झाले आहे.अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि उरण तालुक्याचे अभ्यासू उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक असलेले अजित काशिनाथ जोशी यांनी सुरवातीपासूनच शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवीला आहे.अजित जोशी हे १७/१/२००४ मध्ये सर्वप्रथम पुनाडे जिल्हा परिषद शाळेत रुजू झाले. त्यानंतर दुसरी शाळा जासई तर तिसरी शाळा गोवठने असून त्यांनी या सर्व शाळेत उत्तम अध्यापनाचे काम केले.आजपर्यंत त्यांनी २१ वर्ष ८ महिने अविरतपणे, अखंडीतपणे विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले आहे.


विदयार्थ्यांशी जव‌‌ळीक साधून,विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणे हे शिक्षक अजित जोशी यांच्या अध्यापनाचे महत्वाचे वैशिष्ये आहे.कृतीयुक्त खेळातून शिक्षण ही महत्वाची संकल्पना त्यांनी अध्यापना द्वारे राबविले. कृतीयुक्त खेळातून शिक्षण हे त्यांच्या अध्यापनाचा महत्वाचा भाग आहे. अजित जोशी यांनी गोपाळकाला , नवरात्र संचालन,मनोरे, जयंती, योगासने, सहल आदी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला. शिक्षक अजित जोशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार २०१९, महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती कडुन आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४-२५, तालुका स्तरीय निपुण अंतर्गत निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक तसेच विविध पुरस्कार मिळालेले आहेत.शिक्षक अजित जोशी यांच्या आजपर्यंतच्या कार्याची, अध्यापनाची,राबविलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाची दखल घेत रायगड जिल्हा परिषदेने त्यांना २०२५-२०२६ चा आदर्श जिल्हा पुरस्कार जाहीर केला आहे.उत्तम लेखक,उत्तम शिक्षक, उत्तम सामाजिक कार्यकर्ते असलेले अजित काशिनाथ जोशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकांचा, शुभेच्छांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेवून त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.तर अनेकांनी व्हाटअपऍप, फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक अजित जोशी यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |