Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

खेळ आणि शिक्षणासाठी उत्तम पर्याय म्हणजे एस. एम. एम. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज - प्रमोद वाघमोडे

ठाणे : आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी एस. एम. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, ठाणे येथील पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीता मिरकर मॅडम तसेच विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर व कर्मचारीवर्ग यांच्या वतीने प्रमोद वाघमोडे सरांचा सत्कार करण्यात आला.

प्रमोद वाघमोडे यांची क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संघटनांच्या विविध पदांवर नुकतीच झालेली निवड व नियुक्ती ही गौरवास्पद बाब असल्याने त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक व कर्मचार्यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कार स्वीकारताना वाघमोडे यांनी या मान्यवर गौरवाबद्दल मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद तसेच कर्मचारीवर्गाचे मन:पूर्वक आभार मानले.

दरम्यान, एस. एम. एम. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पूर्व प्राथमिक विभागामध्ये नर्सरी, ज्युनिअर व सीनिअर केजीच्या वर्गात `प्ले-वे मेथड'द्वारे शिक्षण दिले जाते. पात्र व प्रशिक्षित शिक्षकवर्ग, उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचा दृष्टिकोन यामुळे ठाण्यातील पालकवर्गाने या स्पोर्ट्स-ओरिएंटेड शाळेत प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |