डोंबिवली ( शंकर जाधव ) : करोना महामारी संकट गेल्यानंतर मानसिक आजाराचे प्रमाण वाढत आहे.डोंबिवली शहरात 10 ते 20 टक्के मानसिक आजराचे प्रमाण असून कल्याण डोंबिवलीतकरांनी मानसिक स्वास्थाकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे.गेल्या दहा वर्षात डोंबिवलीत सुमारे 65 हजार, कल्याणात दहा ते 12 हजार म्हणजे असे मनोविकाराशी सलग्न असे रुग्ण माझ्याकडे उपचारासाठी आले होते.डोंबिवलीत दहा ते बारा मानोपचारतज्ञ आहेत.ही संख्या उपचाराकरता आलेल्या रुग्णांची असून अनेक मनोरुग्ण आहेत जे उपचाराकरता येतच नाहीत, ते सहन करता राहतात. कारण यातील गैरसमज आहे की मानोसपचारतज्ञाकडे उपचाराकरता गेलो म्हणजे वेडसर. पणा तर या आजारावर उपचार आहेत का?, त्यांना डॉक्टर्स आहेत का हेच मुळात काहीना माहित नसते.अशी बरेच लोक अंधश्रद्धेच्याआहारी जातात.जो सर्वे झाला हे तो असा की 100 पैकी 14 जणांना हा आजार आहे. मानसिक आजारात तरुणांचे प्रमाण जास्त असून 20 ते 35 वयोगटातील 70 ते 80 टक्के तरुण आहेत अशी माहिती मनोसपचारतज्ञ डॉ. विवेक चिंचोले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अधिक माहिती देताना मनोसपचारतज्ञ डॉ.विवेक चिंचोले म्हणाले, 10 ऑकटोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो.उद्देश असा आहे की जनजागृती करणे. मानोसपचारतज्ञाकडे उपचाराकरता जाणे म्हणजे वेडसर असा समज ठेवू नका.चिंतेच, तणावाचे प्रमाण वाढत आहे.
कल्याण डोंबिवलीत नशेखोरांचा प्रमाण वाढत आहे.मनोविकार पेक्षा मनोविकास हे जास्त महत्वाचे आहे.त्याकरता तणावनियोजन हे अगदी सुरुवातीपासून म्हणजे लहान मुलांना शिकविले पाहिजे आणि आपण स्वतः हे आत्मसात केले पाहिजे.संदेशदयायचा असेल तर चारसूत्रांचे पालन केले पाहिजे.आहार, विहार, निद्रा आणि विवेकी विचार याकडे लक्ष दिले पाहिजे.झोप व्यवस्थित झली पाहिजे, कारणझोपेचा सवयी चुकल्यानेही मानसिक आजार होतात.मोबाईल स्किन टाईम कमी करावा. आपण असे ठरवलं पाहिजे की, टेक्नॉलॉजी फास्ट म्हणजे महिन्यातून एक दिवस येणार मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही इंटरनेट काहीच वापरायचे नाही. हे कुटुंबाने ठरवणे आवश्यक आहे. टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन जायची प्रचंड सवय लागली लोकांना त्याच्यामुळे कितीतरी वेळ जातो कॉन्स्टिपेशनच प्रमाण वाढत चाललेलं आहे. झोपण्याआधी मोबाईल नको, जेवणाच्या टेबलावर मोबाईल नको, तुम्ही एकमेकांशी बोला.व्यायाम आणि योगा केला पाहिजे. बिनशर्त इतरांना, परिस्थितिला स्वीकारा, माणूस आहे चुका होतील, पुढील वेळेला चुका होणार नाही याची काळजी घ्यावी.
