Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची जिल्हाधिकारी, जळगाव पदावर बदली — ठाणे जिल्हा परिषदेच्या विकासाच्या वाटचालीत योगदान मोलाचे

ठाणे — जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे (भाप्रसे) यांची बदली जिल्हाधिकारी, जळगाव या पदावर करण्यात आली असून, त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात अनेक नाविन्यपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रम राबवून विकासाची नवी दिशा दिली आहे.

गेल्या काही महिन्यांत त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद ठाणेने डिजिटल प्रशासन, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, लोकाभिमुक, गतिमान आणि पारदर्शक शासन या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले.

या कार्यकाळात महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्तापरिषद (QCI) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘कार्यालयीन मूल्यमापन - 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा’ अंतर्गत जिल्हा परिषद, ठाणे राज्यभरातून प्रथम क्रमांकावर आली आहे.

प्रशासनिक कार्यकाळातील उल्लेखनीय उपक्रम :

१. Door Step Delivery – नागरिकांच्या दारापर्यंत शासन

नागरिकांना शासकीय कागदपत्रे घरबसल्या मिळावीत यासाठी “Door Step Delivery” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून ४३१ ग्रामपंचायतींमध्ये सेवा कार्यान्वित करून नागरिकांना थेट घरीच कागदपत्रे मिळाली.

२. दिशा उपक्रम – शिक्षणातील क्रांती

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी “दिशा उपक्रम” अंतर्गत ३१ लाख एआय-आधारित चाचण्या घेण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या भाषा आणि गणित विषयातील अध्ययन स्तर दुपटीपेक्षा अधिक वाढला असून, महाराष्ट्र शासनाने या उपक्रमाचा समावेश “निपुण महाराष्ट्र” योजनेत केला आहे.

३. ई-ऑफिस आणि डिजिटल शासन

सर्व फाईल व पत्रव्यवहाराचे डिजिटायझेशन करून “ई-ऑफिस” प्रणाली लागू करण्यात आली.
कागदविरहित कामकाज, सात दिवसांत नस्ती निपटारा आणि पारदर्शक प्रशासन हे ठाणे जिल्हा परिषदेचे वैशिष्ट्य बनले.

४. स्कीम ॲप्लिकेशन पोर्टल

जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांची माहिती आणि डिजिटल अर्ज सादरीकरणासाठी एकत्रित पोर्टल तयार करण्यात आले, ज्यामुळे नागरिकांना योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे झाले.

५. Block Facilitation Committee

तालुका स्तरावर ग्रामस्थांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी “ब्लॉक फॅसिलिटेशन कमिटी” स्थापन करण्यात आली, ज्यामार्फत अधिकाऱ्यांनी थेट ग्रामपातळीवर भेट देऊन अडचणी सोडवल्या.

६. ई-कामवाटप व ई-एचआरएमएस

विकास कामांचे पारदर्शक वाटप आणि ५०० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची डिजिटल सेवा पुस्तके या प्रणालींमधून उपलब्ध करून देण्यात आली.

७. एआयचा (AI) उपयोग – स्मार्ट प्रशासनाकडे वाटचाल

शासकीय टिपणी, अहवाल, सादरीकरण आणि दस्तऐवज विश्लेषणासाठी ChatGPT, NotebookLM, Canva, Gamma आणि Myka App यांचा वापर करून शासकीय कामकाज अधिक वेगवान आणि प्रभावी करण्यात आले.

८. जिल्हा परिषद सुशोभीकरण

जिल्हा परिषदेच्या इमारतीत स्वच्छता, रंगरंगोटी, अभ्यागत कक्ष, हिरकणी कक्ष आणि माहितीपर Kiosk स्थापन करून नागरिकांना सुलभ सेवा मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले.

दापूरमाळ विकासकामांना प्रत्यक्ष प्रारंभ; रस्ते, घरकुल, पाणीपुरवठा व शाळा बांधकामाला गती
शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत अजनूप अंतर्गत असलेल्या दापूर माळ या अतिदुर्गम भागातील विविध विकासकामांना गती दिली.
दापूरमाळ येथे सुरू झालेली प्रमुख कामे:
•रस्ते: वनविभागाच्या सहकार्याने दापूर माळपर्यंत सुमारे ५ किमी रस्त्याचे काम सुरू.
•घरकुल: एकूण ३३ मंजूर घरकुलांच्या बांधकामाला प्रारंभ, CSR निधीमधून विशेष सहाय्य.
•पाणीपुरवठा: अजनूप गावातून दोन टप्प्यांत लिफ्टिंगद्वारे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित.
•शाळा व अंगणवाडी: साहित्य वाहतूक पूर्ण करून बांधकाम प्रत्यक्ष सुरू.

कार्यांची दखल

रोहन घुगे यांच्या “मिशन दीपस्तंभ” या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत केलेल्या वाढीबद्दल ‘स्कॉच पुरस्कार’ मिळाला आहे.
तसेच, वर्धा जिल्ह्यात कुपोषणमुक्त ग्राम, पीएम विश्वकर्मा, कृषी व आरोग्य क्षेत्रातील अनेक यशस्वी प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली राबवले गेले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |