ठाणे,दि.07 :- मा.सचिव, राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील आदेश क्रमांकः- रानिआ/जिपपंस-2025/प्र.क्र.20/का-7, दि.23/09/2025 अन्वये राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे.
त्यानुषंगाने, ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती शहापूर / मुरबाड / कल्याण / भिवंडी /अंबरनाथच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयतील सूचना फलकावर दि.08 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
तरी सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, मतदार यादी संबंधीत तहसिलदार कार्यालयात पाहणीसाठी उपलब्ध असून मतदार यादीबाबत काही आक्षेप अगर हरकती असल्यास दि.08 ऑक्टोबर 2025 ते दि.14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत संबंधित तहसील कार्यालयात आक्षेप अगर हरकती नोंदविता येतील, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रुपाली भालके यांनी कळविले आहे.
