डोंबिवली ( शंकर जाधव ) : मुंबई व ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 21 गुन्हे दाखल असलेला चोरट्याला पकडण्यास डोंबिवली पश्चिमेकडील विष्णूनगर पोलिसांना यश आले आहे.डोंबिवलीतील एका 90 वर्षीय महिलेच्या घरी दोन तोळ्याची चैन चोरल्याची तक्रार विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल होती. या गुन्हाचा तपास करत असताना या चोरट्याला पोलिसांनी गजाआड केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक आरोपीचे नाव गणेश उर्फ सुभान संजय करावडे (33) असून तो निळजे परिसरातील राहतो. त्याच्यावर डोंबिवलीतील विष्णूनगर, रामनगर दहीसर, ठाणेनगर, नौपाडा, मानपाडा,
चेंबूर, टिळकनगर, सायन, पंतनगर, दहीसर पोलीस ठाण्यात एकूण 22 घरातील चोरी व अर्थीक फसवणूक असे गुन्हे दाखल आहेत. जेष्ठ महिलेच्या घरी जाऊन हा चोरटा टीव्ही दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने घरात येऊन दोन तोळे सोन्याची चैन घेऊन पसार झाल्याची घटना डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील मंगला अपार्टमेंट मध्ये 2 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.
या चोरट्याला अटक करून त्याच्या कडील चोरीची सोन्याची चैन पोलिसांनी हस्तगत केली. सोमवार 6 तारखेला विष्णूनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी ज्येष्ठ महिलेच्या मुलीला बोलावून डोंबिवली विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे आणि विष्णूनगर पोलीस ठाण्याचे व.पो.नि चोपडे यांनी सोन्याची चैन दिली.
